Uncategorized

नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवकापदा साठी 29 अर्ज मागे

शनिवार.22. नोव्हेंबर 2025

पूर्णा प्रतिनिधीः- पूर्णा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आज दि २१ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी २ महिला अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन नगराध्यक्ष पदा करिता १४ उमेदवार रिंगणात आहेत तर नगर सेवक पदासाठी विविध प्रभागातून २९ उमेदवारानी माघार घेतली असुन उर्वरीत ११२ उमेदवार रिंगणात आहेत. पूर्णा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये दि १८ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाणणी करण्यात आली त्यात १२ उमेदवार अपात्र झाले होते आणि १६ उमेदवार पात्र ठरले होते आज दि २१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्यामध्ये दोन महिलांनी उमेदवारी मागे घेतली असुन आता नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात १४ महिला आपले नशिब अजमावत आहेत मागे घेतलेल्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार १) शे रजिया बी नूर २) मोहम्मद वसिया सुलताना अखिल अहमद यांचा समावेश आहे तसेच सदस्य पदाची उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार पुढील प्रमाने प्रभाग क्र १ मधून अ कुरेशी शाहिस्ता म.जाकीर ,२ निलोफर इब्राहीम प्रभाग क्र १ ब शेख हिलाल मन्नान २) चाँद शेख सुभान ३) सोहेल शफी कुरेशी ४) मोहम्मद फरीक साब बागवान, प्रभाग क्रं २ मधून अ हिवरे गायत्री गजानन ब अग्रवाल प्रविण सत्यनारायण प्रभाग क्र ३ मधून अ तायडे संगिता अनिल ब १) कुरेशी महेमुदा बेगम शेख महेबूब २) कुरेशी सुमया शेख रऊफ ३ खान इम्रान खान शादुल्ला प्रभाग क्र ४ अ सोनवणे साहेबराव मुंजाजी प्रभाग क्र ५ अ आढाव शालिनी किशोर प्रभाग क्रं ६ मधून ब शेख रफिक प्रभाग क्रं ७ मधून अ १) भालेराव स्वाती राजेश २) पळसकर शिवनंदा बाई बाबाराव ३) कापसे विजयाताई शरद ब १) प्रविण सत्यनारायण अग्रवाल २) मुथा विनोद तेजमल ,प्रभाग क्रं ८ अ सुर्यवंशी पुष्पा किशोर प्रभाग क्रं ९ अ एंगडे पूजा नागेश ब मोहम्मद मुजीब मोहम्मद हाजी कुरेशी प्रभाग क्रं १० ब अहेमद बिलाल अखिल प्रभाग क्रं ११ अ डोंगरे सखाराम चोखाजी ११ ब वाघमारे सुजाता चैतानंद प्रभाग क्रं २ अ राधाबाई प्रकाश होळपादे प्रभाग क्रं ३ ब शेख सादिक जुन्मशाह शेख प्रभाग क्रं ९ क खुरेशी शमीम बी मगदुम असे दि 20 व 21 नोव्हेंबर रोजी एकूण२९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेतांना प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांची मते आपल्याकडे वळवल्या जातील व उमेदवारांना उमेदवारी माघार घेण्यासाठी विनवणी तर मध्यस्थी करून किंवा तडजोड करण्यात यश आले परंतू काही उमेदवारांनी कुणाला ही न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!