प्रशांत वाघमारे यांची SCRMU कर्मचारी संघटनेच्या नांदेड विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

रविवार 16 नोव्हेंबर 2025
पूर्णेचे भूमिपुत्र व दक्षिण मध्य रेल्वे मजदुर युनियन कर्मचारी संघटनेचे तरुण नेते कॉ. प्रशांत रावण वाघमारे ( कार्यालय अधीक्षक, नांदेड ,दमरे) यांची ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशन चे महामंत्री कॉ. शिव गोपाल मिश्राजी व दक्षिण मध्य रेल्वे मजदुर युनियन चे जनरल सेक्रेटरी कॉ डॉ सी एच शंकर राव यांच्या आदेशाने विजयवाडा येथे पार पडलेल्या वार्षिक सभेत विभागीय सचिव कॉ टी मनी कुमार यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे मजदुर युनियन च्या नांदेड विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी विभागीय सचिव कॉ. टी मनीकुमार यांनी सांगितले की SCRMU कर्मचारी संगठन ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन नेहमीच आंदोलने करीत आलेली संघटना आहे आणि या संघटनेत तरुणांना वेगवेगळ्या मोठ्या पदावर जबाबदारी देण्यात आलेली आहे.येणाऱ्या काळात संघटनेतील तरुण नेतृत्व हे कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न प्रशासनासमोर मांडतील व कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देतील.
कॉ.प्रशांत वाघमारे यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ कामगार नेते कॉ अशोक कांबळे, कॉ संजय इंगळे, कॉ.शेख अहमद, कॉ महानंद गायकवाड कॉ सी के खंदारे, कॉ.छोटू राम मीना , कॉ. खासीम पिरा , CCS डायरेक्टर कॉ कपिल थोरात,कॉ. नितीन चव्हाण, कॉ. निकेत, कॉ.रिचेल मॅडम, कॉ.गायकवाड, कॉ.माधव बाल्फेवाड, कॉ. मुजाहिद खान, कॉ. बाळू गायकवाड, कॉ. हर्षवर्धन बागुल, कॉ. अंकित राज, कॉ. मो निसार, कॉ. चंद्रपाल राजभोज, कॉ.गौतम काळे, कॉ राजू भिसे, कॉ. प्रभाकर चुनोडे, कॉ रोहित मित्रे , कॉ शैलेश विश्वकर्मा , कॉ. शेख नईम, कॉ.अमोल नाईकनवरे व सर्व नांदेड डिव्हिजन मध्ये संघटनेच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी कॉ.प्रशांत वाघमारे यांच्या नियुक्तीचे जल्लोषात स्वागत केले आहे.



