प्रभाग 17 मधून तरुण नेतृत्व असलेले रमेश पवार यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी

परळी (प्रतिनिधी) बाबा शेख
परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज (दि. 9 नोव्हेंबर) झालेल्या जनसंवादात सर्व समाजातील नागरिकांनी तरुण सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करत त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की काम करणारा माणूस हवा, आणि तो म्हणजे रमेश पवार असा विश्वास सर्व समाजाच्या मनावर पक्का झाला आहे.
गेल्या काही वर्षांत रमेश पवार यांनी वडर कॉलनीसह इतर वस्तीतील नागरिकांसाठी अनेक महत्वाची कामे करून दाखविली. विशेषतः ज्यांच्या जागा नगरपालिकेत नोंद नव्हत्या अशा भागांना पीटीआर मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने पूर्ण केले. परिणामी वडर कॉलनीसह अनेक कुटुंबांना हक्काचे दस्तऐवज प्राप्त झाले.
विधवा महिलांसाठी पगारप्राप्तीची प्रक्रिया सुरू करणे, नागरिकांचे अडकलेले राशन कार्ड प्रश्न सोडवणे, सुखदु:खात सतत धावून जाणे, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची उभारणी, नाल्यांचे बांधकाम आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता—ही सर्व कामे नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी आहेत.
मजनसंवादात सर्व समाजातील नागरिकांनी स्पष्ट केले की, “प्रभागातील विकास थांबू नये, यासाठी तरुण, प्रामाणिक आणि कामावर विश्वास असणारे नेतृत्व म्हणजे रमेश पवार.”
यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 17 साठी रमेश पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची जोरदार मागणी होताना दिसत आहे.
प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलेली भावना एकच
“आम्हाला जनसेवक हवा आणि तो फक्त रमेश पवारच!”



