Uncategorized

टिळेकर मळा प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षिका सारीका ताटे यांचा सत्कार

(ता. हवेली जि पुणे)
टिळेकर मळा प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षिका सारीका कांचन ताटे यांच्या सत्कारसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण, प्रेम, शिस्त आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण करणाऱ्या या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचेही स्वागत करून त्यांचे शाळा परिवारात सहर्ष स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऊरुळी काचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “प्राथमिक शिक्षण हीच व्यक्तिमत्त्व विकासाची खरी शाळा असते. संघर्षाशिवाय यशाची कुठलीही वाट तयार होत नाही. आम्हीही याच शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्याच शिक्षणाने जीवनात उभं राहण्याची ताकद दिली. विद्यार्थी परिश्रम, शिस्त आणि ध्येय ठेवून वाटचाल केली तर भविष्यात कोणतेही पद दूर राहत नाही.”कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी संजय टिळेकर होते.या कारेक्रमाचे आयोजन आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले,व ग्रामंपचायत सदर्श राजेद्र टिळेकर यांनी केले होते, मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षिका सुवर्णा रसाळ, शिक्षिका रेखा फिरोज शेख, शिक्षक संतोष वनकुद्रे, रामचंद्र केशव टिळेकर, मिलिंद जगताप, पोपराव ताम्हाणे, बाळासाहेब चौवरे, दिपक टिळेकर, विजय टिळेकर, पत्रकार अमोल भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमास शाळेतील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी कांचन ताटे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन शाळा परिवाराने केले तर कारेक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टिळेकर यांनी केले.

























			
		

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!