Uncategorized

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ॲथलेटिक्स मधील पुणे येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या18 खेळाडूंचा सत्कार

शनिवार 30 ऑगस्ट 2025

परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 29/09/2025 रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव स्वामी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष एकलारेतर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अच्युतराव जोगदंड सोमेश्वर विद्यालय गौर तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सहशिक्षक क्रीडाशिक्षक प्रकाश रौंदळे सर सारंग सर व सुमित माने सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रथमता हॉकीची जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या पूजन करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा असोसिएशन मार्फत सत्कार करण्यात आला यामध्ये प्राचार्य अच्युतराव जोगदंड सरांनी विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष देऊन आपल्या देशाचे नाव उज्वल करावे मनुष्य खेळातून पुढे जातो माणसांमध्ये हार जीत पचविण्याची क्षमता निर्माण होते नियमित सराव करून खेळाडू आपले करिअर घडू शकतो असे सांगितले यानंतर सहशिक्षक सारंग सर यांनी खेळातून मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो असे सांगितले तर अध्यक्ष समारोपात महादेव स्वामी सरांनी खेळाचे जीवनातील महत्त्व सांगितले यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये योगेश बोबडे शेख फैजान शेख समंदर दशरथ पवार अनिकेत भोसले मोहम्मद अफरोज मोहम्मद इलियास रुद्र जामगे आरती भोसले मंजुषा राजमाने वैशाली शिंदे हर्षदा पारटकर श्रावणी जामगे,भाग्यलक्ष्मी भोसले स्नेहल शिंदे जान्हवी भाले गौरी भोसले वैशाली सूर्यवंशी, आरती शिंदे,प्रणिता तांबे,नंदिनी देवणे, या सर्व तेच तरी स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडूंचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन वैशाली धुत जान्हवी भाले यांनी केले. आभार प्रदर्शन परभणी जिल्हा हौशी लंगडीअसोसिएशनचे सज्जन जयस्वाल यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्धव बोबडे, संतोष बहोत, शेख अय्यान शेख खादर यांनी परिश्रम घेतले या खेळाडूंना मार्गदर्शन सज्जन जयस्वाल प्रकाश रौंदळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!