आमदार.हेमंत पाटील यांच्यावर कठोर कार्यवाहीची पोलीस संचालकांकडे मागणी

गुरुवार 17 जूलाई 2025
पूर्णा: आमदार हेमंत पाटील यांनी विधापरिषदेत परभणी येथे आंबेडकरवादी दलित महिलांनी “परभणी जिल्हाधिकारी यांना लाथा मारल्याचे” खोटारडे विधान परिषदेच्या सभागृहात करून सभागृहाचीदिशाभूल केली.त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावडे आणिदलित महिलांचा अपमान केल्याने त्यांच्यावर कठोर कार्यवाहीची मागणी राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडेपूर्णा शहरातील विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली आहे. सदर प्रकरणी एका निवेदनाद्वारे आमदार हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला.सदरचे निवेदन पूर्णा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास घोबाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील यांना देण्यातआले. आ.हेमंत पाटील यांनी परभणी येथे एका इसमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्यासंविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याबाबत साधी खंतही व्यक्त केली नाही.उलट संतप्त आंबेडकरवादी महिलांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथगावडे यांचेकडे आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीती परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली.त्याबद्दलही हेमंत पाटील एकही शब्द बोलले नाहीत.उलट महिलांनी त्यांना लाथानी मारल्याचा खोटे विधान परिषदेच्या सभागृहात करून सभागृहाची दिशाभूल केली.शिवाय नांदेड जिल्ह्यात बोंधारी येथे लग्नातील वरातीत एका दलित तरुणाचा खून झाल्या प्रकरणी नवरदेव आणखी जेल मधे असल्याचेहेमंत पाटलांनी नमूद केले.परंतु वरातीतदलित तरुणाचा खून झाल्या चे दुःख नाहीकी त्याचा साधा निषेधही त्यांनी केला नाही.परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचामृत्यु पोलिसांच्या माराने झाला,असे उच्चन्यायालयाने सांगितले.परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची मोडतोड करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही कराम्हणणाऱ्या आंदोलक महिलांवर पोलिसांनी लाठचार्ज करून अनेकमहिलांना कायम अपंग केले.त्यांचाअपमान केला त्याबद्दल हेमंत पाटील सभागृहात अवाक्षरही बोलले नाहीत.याची खंत व्यक्त करून आमदार हेमंत पाटील यांच्यावर कठोर पोलीस कार्यवाहीकरावी अशी मागणी पोलीस संचालकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर रिपाई नेते प्रकाश कांबळे,न.प.चे गटनेते उत्तम खंदारे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड,ॲड. धम्मा जोंधळे,दादाराव पंडीत, विरेष कसबे,संजय शिंदे,मिलिंद सोनकांबळे,प्रवीण कनकुटे,अतुलगवळी,त्रिंबक कांबळे,गौतम काळे,रमेश बरकुंटे,मोहन लोखंडे,अनंत काळे,अमृत कऱ्हाले सय्यद कलीम आदि मान्यवरांच्यास्वाक्षऱ्या आहेत.



