Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी आशा हटकर यांची निवड करण्यात आली

शनिवार 12 जुलै 2025

पूर्णा /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी पूर्णा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीमती आशा रविंद्र हाटकर यांची निवड करण्यात आली ही घोषणा सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवती वाघमारे यांनी केली हा वाढदिवस सोहळा रमाई नगर येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैजनाथ दीपक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण भगत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रचणा भालेराव,शहराध्यक्ष आनंद कणकटे यांची उपस्थिती होती याप्रसंगी श्रीमती आशा हटकर यांनी निवड झाल्याबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदादा विटेकर तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे महिला तालुकाध्यक्ष रचना भालेराव यांचे आभार मानत पक्षासाठी मोठ्या हिरिरीनी काम करण्याचे आश्वासन दिले यावेळी देविदास तुपे आनंद निकाळजे एमडी शिराज आनंद रामजी जोंधळे मिलिंद लोंढे, अंकुश मांजरे,गोविंद गजभारे, सुनील भालेराव, धम्मा कांबळे, पवन पंडित, भागोजी गायकवाड ,सुभाष सोनुले, संजय चव्हाण,भीमराव शिंदे,गोविंद पुंडगे, लक्ष्मीबाई गायकवाड, शांताबाई धुळे, वैजनताबाई वाघमारे, कमलाबाई पंडित, सरस्वतीबाई शंकर ढगे, वंदना दीपक, आशाबाई तुपे ,गिताबाई जोंधळे, चंद्रकलाबाई निकाळजे, प्रणाली तुपे, सुजाता तुपे, वंदना विनोद जोंधळे, ज्योती विजय इंगोले, अनिता कराळे ,संगीताबाई त्रिभुवन सह आदींनी त्यांना निवडी बाबत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी महिला मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!