Uncategorized

गावठी पिस्टलसह तलवारी व इतर घातक शस्त्र जप्त”, स्था.गु.शा. ची कारवाई

बुधवार 30 एप्रिल 2025

परभणी (प्रतिनिधी) दिनांक २९/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हेचे पथक कार्यालयात हजर असंतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मीळाली की मौजे नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार नामे शेर खान पठाण व त्याचे काही मीत्र हे त्याचे राहते घरी व तो वापरत असलेल्या काळ्या रंगाचे गाडीमध्ये धारदार हत्यार व अग्नी शस्त्र (गावठी कटटा) बाळगुन असून ते काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे माहीती मिळाली
सदर ची माहिती पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांना दिली असता त्यांनी तात्काळ स्था.गु.शा. चे पथक तयार करून मार्गदर्शक सुचना व कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यावरुन पोनि स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, व त्यांचे पथकाने नांदखडा येथे शेर खान पठाण या सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडले असता त्याचे सोबत आणीखीन एक सराईत गुन्हेगार नाम हनुमंत रमेश सोनटक्के वय २१ वर्ष रा. वाणी पिंपळगाव ता. पालम जि. परभणी हा देखील मिळून आला त्याचे ताब्यातील स्कॉर्पीयो कार क्रमांक MH23AR2939 मध्ये घातक अग्नीशस्त्र व तलवार मिळून आले व त्याचे घराची घरझडती घेतली असता
आरोपीचे स्कॉर्पीयो कार क्रमांक MH23AR2939 मध्ये व घरात असे मिळून 1 अवैध अग्नी शस्त्र, 4- जिवंत काडतूस व 3 तलवारी, 1-खंजर, 1-गुप्ती, 1-कत्ती व 1-रॉड असे मीळून आले. सदर घातक शस्त्र व चारचाकी वाहन असा एकूण 10,37,200/- मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द पो.स्टे. परभणी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर आरोपीतांविरूध्द यापूर्वी पूर्णा तालुक्यातील चुडावा,मोढा पोलिस ठाणे,पूर्णा, परभणी ग्रामीण,नानलपेठ, गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, स.पो.नि. राजीव मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चटटे, हाणमंत जक्केवाड, सुग्रीव केंन्द्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारोखी, रविकुमार जाधव, सूर्यकांत फड, जयश्री आव्हाड, शेख रफीयोददीन स्था.गु.शा. परभणी व पो.स्टे. परभणी ग्रामीण चे पोउपनि/गडदे व अंमलदार कादरी पो.स्टे. सायबर चे गणेश कौटकर यांनी मिळून केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!