Uncategorized

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांस कारसह ताब्यात” स्था.गु.शा.ची कारवाई

बुधवार 30 एप्रिल 2025

परभणी पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून स्था.गु.शा.चे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढत असतांना आज दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना माहीती मीळाली की आरोपी आकाश भगवान वानरे वय 25 वर्षे राहणार बाजार चौकी, हट्टा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हा मौजे पांढरी गावात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा वाहतूक करीत आहे. सदर ची माहिती पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांना दिली असता त्यांनी तात्काळ स्था.गु.शा. चे पथक तयार करून मार्गदर्शक सुचना व कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोनि स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, व त्यांचे पथकाने मौजे पांढरी येथे पथक रवाना केले असता आरोपी हा त्याची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH46Z7603 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा वाहतूक करतांना मिळून आला असता त्याचे ताब्यातून स्विफ्ट डिझायर कार व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा राजनिवास कंपनीचा गुटखा, V-1 तम्बाकू, प्रिमियम जेड एल-01 जाफरानी जर्दा, केसर युक्त गोवा 1000 असा एकूण 4,24,902 रु. चा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस ठाणे ताडकळस येथे हजर करून त्याच्या व त्याने ज्याचेकडून सदर गुटखा खरेदी केला अशा दोघांविरूध्द गु.र.न. 105/2025 कलम 123, 223, 274, 275, 3 (5) भा. न्या. सं. 2023 सह क.59 अन्नसुरक्षा मा.न. के. कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, पोउपनि श्री. चंदनसिंग परिहार, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे, ने. स्था.गु.शा परभणी व सायबर चे गणेश कौटकर यांनी मिळून केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!