रेल्वे पुलावर सापडला अनोळखी ईसमाचा मृतदेह

सोमवार. 28. एप्रिल. 2025
पूर्णा(प्रतिनिधी) नदीच्या रेल्वे ब्रीजवर एका अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून नोंद केली आहे.सदर अनोळखी इसमाची ओळख पटली नसुन एकाद्या रेल्वेच्या धडकेने सदर इसमाचा मूर्त्यु झाला असावा असा अंदाज पोलिसां कडून लावण्यात येत आहे याबाबत अधिक माहितअशी की, २७ एप्रिल रविवार रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना खबर देऊन कळविले की,परभणीकडे जाणाऱ्या पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवरील खांब क्र.३१७/२५/२७ जवळ एक अंदाजे ४७ वर्षीय ईसम दोन्ही रेल्वे पटरीच्या मधोमध मृतावस्थेत पडलेला असल्याचे सांगितले. घटनेची माहिती प्राप्त होताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोहेकाॅ.डिगांबर राठोड, पोकाॅ.अविनाश डावरे, सुभाष चव्हाण, होमगार्ड प्रकाश वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.यावेळी पोलीसांनी त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले परंतु त्याची ओळख पटली नाही.पोलीसांनी त्यांचे अंगात काळा जिन्स,पांढरा-काळा शर्ट उंची ५ फुट २ इंच सडपातळ बांधा या वर्णनाचा ईसम कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेत मृत्यू पावला असल्याचे वर्णन जाहीर करुन लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालय परभणी येथे शीतग्रहात ओळख पटणेकामी ठेवण्यात आले असून,घटनेचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत.



