Uncategorized

अर्धापूरच्या संदिप कळासरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानितअर्धापूर

गुरुवार 1.मे.2025

ता. २० (प्रतिनिधी):महाराष्ट्र दिनानिमित्त नुकताच अर्धापूर येथील संदिप हरीभाऊ कळासरे यांना २०२४-२०२५ या वर्षासाठीचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मा. पालकमंत्री श्री. अतुलजी सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. राहुलजी कर्डीले आणि माजी मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण व पोलीस महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप तसेच आयुक्त श्री. महेशकुमार डोईफोडे, श्रीमती मेघना कावली यांची उपस्थित होती.जिल्हा युवा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत दिला जातो. समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना युवक विकासाच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.संदिप कळासरे यांनी नांदेड परिसरातील अनेक ठिकाणी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि युवकांना सोबत घेऊन त्यांच्या गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले. उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागातील महिलासाठी कार्य केले. युवकांसोबत घेऊन समाजातील इतर नागरिकांनाही प्रेरित करत सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. जिल्ह्यातील युवकांसाठी केलेले अतुलनीय कार्य उत्कृष्ट असुन त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना २०२४-२५ चा महाराष्ट्र शासनचा जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला.या पुरस्कारामध्ये ₹१०,००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ यांचा समावेश होता. पुरस्कार वितरण समारंभात संदिप कळासरे यांनी हा सन्मान स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!