Uncategorized

पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात क्षयरुग्णांना food किट वाटप

मंगळवार. 25. मार्च. 2025


पुर्णा -प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात आज जागतिक क्षयरोग दिन संपन्न झाला. यावेळी कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थांनी वैद्यकिय अधिक्षक डॉ. लक्ष्मण नाईक यांची उपस्थित होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश गिणगीने यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, आजच्या काळामध्ये क्षयरोग निदान व उपचाराच्या पद्धतीमध्ये झालेल्या अमुलाग्र बदला बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन, संशयितांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. नागेश देशमुख यांनी यावर्षीचे जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो’ “प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” या अनुषंगाने बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप डॉ. लक्ष्मण नाईक यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक संतोष कठाळे यांनी केले यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महान शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूचा शोधा 24 मार्चरोजी लावला त्या निमित्तांने दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. अशी माहिती देऊन क्षयरुग्णास दर महा निक्षय पोषण योजने अंतर्गत एक हजार रुपये दिले जातात त्याचबरोबर दानशूर व्यक्तींनी निक्षयमित्र होऊन क्षय रुग्णास अतिरिक्त पोषण आहार देण्याचे आवाहन केले.
या वेळी डॉ. गजानन शिंदे, डॉ.आकाश उमाटे, डॉ.ऋषीकेश ठाकुर, डॉ.सुप्रिया राजगुरु, डॉ.मोहिणी कदम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कैलास वेदपाठक, संतोष पाटील, गीता राठोड, औषध निर्माण अधिकारी देविदास पोखरीकर, विजयकुमार चुकेवाड, विष्णुकांत आडे, आरोग्य सेविका विजया भगत, प्राजक्ता लाड, उषा पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत खराटे, डॉ. नितिन नरवाडे, डॉ. गणेश काचगुंडे, डॉ. कानखेडकर, डॉ. फरहान खान, डॉ.नदीम अहेमद, अधिपरिचारीका सिंड्रेला झांबरे, महेद्र मकरंद, उद्धव जोशी, मोहन उबाळे, संतोष पोहाल, सुर्यकांत कांबळे आदीसह ग्रा.रु.अधिकारी व कर्मचारी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!