गंगाखेड शहर कृती आराखडा (C-LAP ) समितीची बैठक संपन्न

मंगळवार. 25 . मार्च 2025
दि.25/03/2025 रोजी घेण्यात आली.शहरी गरिबी निर्मुलन योजने अंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले आहे.या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागासोबत बैठक घेण्यात आली.बैठकीचे अध्यक्ष मा.मुख्याधिकारी श्री.जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागातील समितीच्या सदस्यांनी रोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील,शहरातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपले सखोल विचार व्यक्त केले. या बैठकीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख,प्राध्यापक डॉ.सतीशकुमार डोंगे, लेबर ऑफिस प्रतिनिधी,किरण नारायण बलखंडे,सु.ज.पेरके shop inspectore goverment labour office , (OS)कार्यालयीन अधीक्षक शेख सर, तातोडे व्ही.के.दिव्यांग विभाग प्रमुख, कृषी अधिकारी प्रतिनिधी,मगर पी.एच., गटशिक्षण अधिकारी श्री.भगवान ठुले, विस्तार अधिकारी व्ही.एन.फुटके , जिल्हा उद्योग केंद्राचे व्ही.आर.जोंधळे,जिल्हा सांख्यिकी अधिकारी अजिंक्य गवई, SBI बँकेचे पागोटे ए.व्ही., MSW प्रतिनिधी श्री.सदाशिव कुंडगीर, पथविक्रेता प्रतिनिधी भगवान माधव सलगर, विद्युत विभाग सुहास रविंद्र आगलावे, प्रधानमंत्री आवास योजना सहायक साळवे आम्रपाली दामोदर ,कोमल गाडे ,अंजनी शहर स्तर संघ सचिव,शीतल पारवे,प्रियांका घोबाळे,रंजना तुपे,अरुणा व्हावळे,सीमा घनवटे,निर्मला होनराव,निशा साळवे,संगीता साळवे,हनुमान धापसे,मथुराबाई चोरघडे,नरहरी कुटेवाढ. बैठकीचे प्रस्ताविकेमध्ये C-LAP म्हणजे काय तसेच पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत इंटर्नशिप करिता जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी ULB स्तरावरून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. या विषयावर सहायक प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर यांनी मार्गदर्शन केले तर सूत्र संचालन वंदना परतवाघ यांनी केले व आभार शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापक राहुल साळवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्ती संतोषी ढगे,वंदना मोरे,मंगल घाटूळ,सुनिता वाघमारे,राजकन्या नरवाडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.



