गुढी पाडवा, रमजान ईद सण शांततेत साजरा करा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले

बुधवार. 26. मार्च.2025
परभणी : गुढी पाडवा, रमजान ईद आणिरामनवमी हे सण समाज बांधवांनी शांतता व उत्साहात साजरे करावेत. जिल्हा व पोलीस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहिल. त्यामुळे या सर्व सणांसह येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले.गुढी पाडवा, रमजान ईद आणि रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावे-ळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीजीवन बेनीवाल, ग्रामीणचे पोलीस अधिकारी चं-द्रशेखर देशमुख, प्रोफेशनली आयपीएस अधिकारी ऋषिकेश शिंदे उपस्थित होते.पुढे जिल्हाधिकारी गावडे म्हणाले, अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत. हे एक प्रकारे एकात्मतेचे प्रतिकच म्हणावे लागेल. अशावेळी समाजबांधवांनी एकीने सण शांततेत साजरे करावेत असे सांगत सर्वांना गु-ढी पाडवा, रमजान ईद आणि रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, गुढी पाडवा, रमजान ईद आणि रामनवमी सण दोन्ही समाजाने सामंजस्याने व आनंदाने साजरे करावेत. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.



