पूर्णा तालुक्यातील अवैध धंदे बंद करून यात गुंतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारीची चौकोशी करून कारवाई करण्याची मागणी

शनिवार.8. मार्च.2025
पूर्णा (प्रतिनिधी)पोलीस ठाणे अंतर्गत दिवसो दिवस सर्व अवैध धंदे चालू आहे. ज्या मध्ये मटका जुगारए पत्त्यांचे क्लब, अवैध देशी दारु, अवैध वाहतूक. अवैध गुटख्याची तस्करी, वाळूची तर दिवस रात्र तस्करी या सर्व अवैध धंद्याचा समावेश आहे या अवैध धंद्यामुळे अनेक गोर गरीबाचे संसार उध्वस्त होण्याची शक्यता दिसत आहे आणि या अवैध धंदे पूर्णा पोलीस ठाण्याचे अधिकारी व बिट जमादार, पोलीस कर्मचारी यांच्या मूक सहमतीने चालू आहे त्यामुळे बिनदास्त अवैध धंदे सुरु आहे या अवैध धंद्यामुळे तालुक्यात व शहरात गुन्हेगारीत वाढ होत त्यामुळे या अवैध धंद्याकडे त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात काही ही मोठी घटना घडू शकते. त्यामुळे या कडे जातीने लक्ष घालून पूर्णा मध्ये सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी एक विशेष पथक निर्माण करावे आणि जे पोलीस अधिकारी कर्मचारी बिट जमादार यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.अश्या मागण्याचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी समितीचे शहराध्यक्ष जाकीर पठाण यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकाना दिले होते.दरम्यान नुकतेच काही दिवसात विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब पूर्णा दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना खुश करण्यासाठी पूर्णा पोलीस ठाण्याची साफ़ सफाई रंग रगोटी अवैध धंदे चालका कडून होणाऱ्या वर कमाईतुन सदर साफ सफाई रंग रगोटी सुरू तर नाही ना?अशा प्रश्न निर्माण होत आहे. त्या मुळे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी याची ही चौकशी करावी अशी मागणी होत आहेत



