पूर्णेत रंगणार 24 फेब्रुवारीला नामवंत शायर, कविचा मुशायारा कार्यक्रम

बुधवार.19. फेब्रुवारी.2025

पूर्णा /येथे सुरू असलेल्या हजरतं मस्तान शहावली च्या सार्वजनिक उर्स निमित्त सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी मुशायारा कार्यक्रमात नामवंत कवी तथा ,शायराना आमंत्रित करण्यात आले आहे या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पाथरी येथील युवा नेते सईद खान तथा माजी उपनगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे
पूर्णा शहरात हजरत मस्तान शाह वली सार्वजनिक उर्स सुरू आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे येत्या 24 फेब्रुवारी सोमवार रोजी रात्री नउ वाजता जामा मस्जीदी समोर मुशायरा(हास्य कविसंमेलन) होणार आहे या मध्ये नामवंत कवी,शायर अब्रारार कासीफ निजामत,हाशीम फेरोजाबादी,अपूर्व विक्रम शहा, अल्ताफ जिया,नयूम फराज,टीपीकल जगत्याली,लता हया,उरूसा अरशी,सोहेल आझाद,,शायर साबेर भाई,वाजीद मीर्जा सह आदी प्रसिद्ध कवी तथा शायर येणार आहे तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी येथील शिवसेनाचे युवा नेते सईद खान,पूर्णा नगरीचे माजी उपनगरध्यक्ष हाजी कुरेशी, अकोला मतदार संघाचे आमदार साजीद खान पठाण,वसमत चे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज,भाजपाचे हनुमान अग्रवाल, विशाल कदम ,शेख खुद्दुस भाई, उत्तम खंदारे,आयुब कुरेशी, धम्मा जोंधळे, बंटी कदम,विरेश कसबे,शेख शरीफ भाई, बाबा पठाण,अमजद नुरी,उर्स कमेटी अध्यक्ष युसुफ पठाण, कार्यध्यक्ष इलियास चाउस,शफी कुरेशी, मुकीद कुरेशी,इशू पठाण,आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे त्यामुळे या कार्यक्रमास जास्ती जास्त नागरिकानी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावे असे आव्हान या मुशायरा जम्मू भाई , युवा नेते सोहल कुरेशी,वाजीद कुरेशी आदींनी केले आहे



