Uncategorized

सुहागन येथे आठ फूट लांबीचा मादी जातीचा अजगर पकडला

** पूर्णा तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील सुहागन येथे दिनांक १९मे रोजी सायंकाळी ०७:३० च्या सुमारास सोसायटीचे चेअरमन बालाजी नामदेव भोसले यांच्या शेतात गट नंबर २६५ मध्ये अकरा फूट लांबीचे अजगर बऱ्याच दिवसापासून वास्तव्य होते बालाजी भोसले यांना शेतात विहिरीजवळ बऱ्याच वेळेस आढळल्यामुळे त्यांना भीती वाटत होते त्यांनी 19 मे रोजी सर्प अभ्यासक असलेले डॉ विक्रम सारंग सर्पमित्र नवनाथ सारंग यांना बोलावून घेतले व त्यांच्या विहिरीजवळ असलेल्या ११ फूट लांबीचे साडेआठ किलोचे अजगर मादी जातीचे आढळून आला अजगर काढण्यासाठी बराच वेळ लागला अजगर पकडल्यानंतर मांदी जातीच्या अजगराची पाच अंडी सुद्धा सापडले व त्यानंतर गावाकडे आणून गावातील नागरिकांना दाखविण्यात आले मोठा अजगर असल्यामुळे गावातील नागरिकांनी अजगराला पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती बालाजी भोसले यांनी सुटकेचा श्वास सोडल्यानंतर वन विभाग नांदेडला नोंद करून सोडून देण्यात आले वन्यजीव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड येथील सर्प अभ्यासक डॉ. विक्रम सारंग सर्पमित्र नवनाथ सारंग यांचे परिसरातून कौतुक होत आहे तरी कोणाला अजगर कीवा साप दिसला तर डॉ.विक्रम सारंग यांना आपल्या ७०३८३५३१७५ या मोबाईल क्रमांकवर तात्काळ संपर्क करावे असे सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!