*शासकीय धान्यापासून वंचितांना मिळाले हक्काचे रेशन कार्ड*

पूर्णा शहरातील दिव्यांग विधवा परितक्त्या भटके विमुक्त पारधी जमात व इतर गोरगरीब हे मागील अनेक वर्षापासून पूर्णा शहरात वास्तव्यास आहेत, परंतु यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्यामुळे यांना शासकीय धान्य मिळत नव्हते, तेव्हा शासकीय मोफत धान्य मिळण्याची योजना नेमकी कोणासाठी, याची पाहणी केली असता, असे निदर्शनात आले की, पूर्णा शहरातील असंख्य धन दांडगे नामधारी रेशनकार्डधारक यांना या योजनेचा लाभ मिळत होता, म्हणून पूर्णा शहरात वास्तव्यास असलेले भटके विमुक्त पारधी, विधवा व दिव्यांगांचा सर्वे करून, यांना शासकीय मोफत धान्य मिळवून देण्यासाठी, त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे घेऊन, पूर्णा शहरातील 20 दिव्यांग, 9 विधवा व परितक्त्या, भटके विमुक्तांचे पारधी कुटुंबातील 9 कुटुंब तसेच इतर 43 गोरगरीब रोज मजूरदार असे 81 कुटुंबांचे रेशन कार्ड बनवून वाटप करण्यात आले, या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, क्रांतीनगरच्या शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनीर व अली नगरचे शाखाप्रमुख अय्युब शब्बीर शहा यांच्या हस्ते पूर्णा शहरातील 15 शासकीय स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी संलग्न त्या परिसरातील वास्तव्यास असलेल्या 81 गोरगरिबांना शासकीय मोफत धान्य मिळण्यासाठी रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले, प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या प्रयत्नाने पूर्णा शहरातील गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे राशन कार्ड मिळाले, त्यांना शासकीय मोफत धान्य सुद्धा मिळणार म्हणून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, यासाठी हसीना बेगम शेख मगदूम, मीरा पळसकर, तसलीम बेगम, पंचशीला खंदारे, रेणुका पवार, सिराजभई हुसेनसाब, एजाज, सलीम, रफिक शाहा, मुन्ना शेख, खलील बेग, नन्हूमिया, अफजल खान, रोशन पठाण, शेरखान, वाजिद खान, धर्मा भोसले, भगवान पुंडगे, वनटणकर, पांचाळ, तानाजी, गंगाधर गायकवाड ईत्यादींनी परिश्रम घेतले



