Uncategorized

तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरामध्ये सामूहिक महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन*

*…!पूर्णा :-दिनांक 23 मे रोजी गुरुवार सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामूहिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध विहारा समोरील जिल्हा परिषद शाळेच्या प्रशस्त मैदाना वर भदंत उपाली थेरो नगर पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो भीम बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत बोधिधम्मा बुद्ध विहार पूर्ण येथील भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प व पुष्पहार अर्पण करून. पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी ठीक 8 वाजता पूजनीय श्रद्धेय भिकू संघाच्या हस्ते महाबुद्ध वंदनेस सुरुवात होईल. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शन व धम्मदेशना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ व श्रद्धेय भिक्कू संघ. सकाळी ठीक नऊ वाजता बुद्ध विहारा पासून महामानव तथागत भगवान बुद्ध यांची सजवलेल्या रथामधून वाद्य वृंदासह धम्म मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीचा मार्ग बुद्ध विहार स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक किंग कॉर्नर पोलीस स्टेशनच्या मागून डॉक्टर आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी मिरवणुक आल्यानंतर सकाळी 10 वाजता डॉक्टर आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत बोधिधम्मा यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्व जाचे ध्वजारोहण भिक्कू संघाच्या असते त्रिशरण पंचशील उपस्थितांना देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहावे अशा प्रकारचे आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा 2024 बुद्ध विहार समिती पूर्णा भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्ण समता सैनिक दल पूर्णा शहरातील सर्व धम्म सेवाभावी महिला मंडळ सर्व धार्मिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आदींनी केलेले आहे. महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक बौद्धानी आपल्या घरावर पंचरंगी धमध्वजाचे ध्वजारोहण करावे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. पांढरे शुभ्र कपडे परिधान करावे. अशा प्रकारचे आवाहन ही जयंती मंडळांने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!