Uncategorized

विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांना सामोरे जाताना खेळाडू भावना जोपासली पाहिज

प्रतिनिधि अर्धापूर: खतीब अब्दुल सोहेल

विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी जीवनात अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागते. प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची कस लागते, स्पर्धा असली की यश अपयश हे असतेच पण विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत खेळाडू भावना जोपासली पाहिजे.खेळातून जीवनातील संघर्षाची प्रेरणा मिळते असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय उद्धवराव भोसले यांनी केले. ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर द्वारा आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, क्रीडा परिसर येथे विभागीय आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धा-2023 च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेडचे सहसचिव प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.मनोज रेड्डी, डाॅ.माधव शेजुळ,डाॅ.भास्कर माने, इम्तियास खान, डाॅ. महेश बेंबडे, डाॅ. महेश वाखरडकर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पठाण जे.सी. क्रीडा संचालक डॉ. विक्रम कुंटूरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले की विद्यापीठ नेहमी विद्यार्थी हिताचेच अनेक निर्णय घेते. विद्यापीठ आखलेल्या धोरणानुसारच कार्य करीत आहे त्यामुळेच विद्यापीठाचा नावलौकिक होत आहे. या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी घडत आहे असे ते म्हणाले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अ, ब,क व ड विभागाच्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धा 2023 चे आयोजन शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर यांनी दिनांक 10 व 11 ऑक्टोबर 2023 या दरम्यान केले. सदरील स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा परिसराच्या संकुल या ठिकाणी संपन्न झाल्यात. या स्पर्धेत विद्यापीठ परीक्षेतील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयाचे अनेक खेळाडू आपापल्या झोनमध्ये यशस्वी होऊन या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत मुला-मुलींचे 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, रिले, गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, चालणे, लांब उडी, उंच उडी, ट्रिपल जंप यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर म्हणाले की दिवसेंदिवस खेळाडूंची संख्या कमी होत चाललेली आहे ही चिंतेची बाब असून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात क्रीडेला अविभाज्य अंग करावे. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहील तसेच आपल्या देशाचे भविष्यही उज्वल राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळास आपल्या जीवनात महत्त्व दिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर विक्रम कुंटूरवार व क्रीडा समितीचे सदस्य डॉ.मधुकर बोरसे, डॉ.विलास चव्हाण, डाॅ. एस.पी.औरादकर, डॉ.काजी मुक्तारोद्दीन, डाॅ. दिनानाथ बीच्चेवार, डॉ.विनोद शिंदे यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत अनेक पंचांनी निपक्ष पद्धतीने मूल्यांकन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डाॅ.जे.सी.पठाण यांनी केले, सूत्रसंचालन डाॅ.काजी मुख्तारोद्दीन यांनी केले, तर आभार क्रीडा संचालक डॉ.विक्रम कुंटरवार यांनी मानले. या स्पर्धेत पंच म्हणून डॉ.दिलीप भडके, डॉ.असीम बोरीकर, डॉ.बालाजी जाधव, डॉ.मनोज पैजणे, डॉ. अनिरुद्ध बिराजदार, डॉ.आदित्य माने, डॉ.सतीश मुंडे, डॉ.गुरुदास लोकरे, डाॅ. उस्मान, डॉ. सचिन चामले हे वेगवेगळ्या महाविद्यालयाचे क्रीडा संचालक पंच म्हणून सहभागी झाले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक महाविद्यालयातील क्रीडा समितीचे सदस्यासह अरविंद जामगे, बालाजी पंदिलवाड, सदाशिव सिंगारे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!