Uncategorized

पूर्णा पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी स्वीकारली सूत्रे महिला पोलीस पाटलांकडून जंगी स्वागत

सोमवार 25 मे 2026

पूर्णा (प्रतिनिधी ):

पूर्णा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन बेंद्रे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज भूमिकेमुळे पोलीस दलात आणि परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्णा तालुक्यातील महिला पोलीस पाटलांच्या वतीने सचिन बेंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कारप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी स्पष्ट शब्दांत गुन्हेगारांना इशारा दिला आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस २४ तास तत्पर आहेत, पण समाजकंटक किंवा अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे खणखणीत विधान सचिन बेंद्रे यांनी केले.गावपातळीवरील सुरक्षेसाठी पोलीस आणि पोलीस पाटील हा दुवा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत,गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी पोलीस पाटलांना केले.यावेळी महिला पोलीस पाटलांनी नूतन निरीक्षकांचे स्वागत करत, पोलीस प्रशासनाच्या कडक शिस्तीला आमचे पूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. पोलीस निरीक्षक बेंद्रे यांच्या आगमनामुळे तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप बसेल आणि कायद्याचा दरारा पुन्हा एकदा निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!