Uncategorized

पूर्णा येथे ‘संविधान गौरव सोहळ्या’ची नियोजन बैठक थाटात संपन्न

सोमवार 5 जानेवारी 2025

पूर्णा (प्रतिनिधी):पुर्णा येथील डॉ.बी. आर.आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संविधान गौरव सोहळ्या’ची पूर्वतयारी बैठक आज नगर परिषद सभागृहात अत्यंत थाटात संपन्न झाली. या बैठकीला शहरातील मान्यवर, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम भैया खंदारे होते, तर मुख्य संयोजक म्हणून नगरसेवक प्रकाश दादा कांबळे (संविधान गौरव समिती) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर नगरसेवक धम्मादींप जोंधळे, नगरसेवक सुनील जाधव, नगरसेवक दीपक रणवीर, प्रा. अशोक कांबळे, प्रा. केशव जोंधळे आणि अशोक व्ही. कांबळे या मान्यवरांची उपस्थिती होती.बैठकीमध्ये आगामी संविधान गौरव सोहळा भव्य-दिव्य पद्धतीने साजरा करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संविधानातील मूल्ये समाजात रुजवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विविध सूचना मांडल्या आणि पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिवाळे सर यांनी केले, तर बैठकीच्या शेवटी अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला डॉ.बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!