माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड

शुक्रवार 2 जानेवारी 2026
पूर्णा (प्रतिनिधी) पूर्णा नगरपरिषदेच्या काँग्रेस आयच्या गटनेतेपदी माजी उपनगराध्यक्ष तथा विध्यमान नगरसेवक हाजी खलील कुरेशी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या सर्व नगरसेवकानी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या समक्ष उपस्थित राहून गटनेते हाजी कुरेशी यांच्या निवडी बाबत नगरसेवक जाकीर कुरेशी नगरसेविका शमीम बेगम शेख शरीफ , पद्मीनबाई एंगडे ,वंदना सत्यभान कुलदीपके यांनी स्वाक्षऱ्या करून निवड केली आहे गटनेते पदी हाजी कुरेशी यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे या निवडीमुळे नगरपरिषदेत पक्षाची बाजू अधिक प्रखरपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. हाजी कुरेशी यांच्या निवडी बद्दल माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जाकीर कुरेशी यांच्या सबोत पक्षाच्या सर्व नगरसेवकानी हाजी खलील कुरेशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.या वेळी युवा नेते रउफ बागवान,माजी नगरसेवक अमजद नुरी, युवा नेते नागेश एंगडे, मिलिंद सोनकांबळे, राजू नारायणकर आणि संजय शिंदे,पत्रकार म अनीस बाबुमीया, शेख सलीम उपस्थित होते तर निवडीची वार्ता पूर्णा शहरात पसरताच हाजी कुरेशी यांच्या समर्थका कडून जल्लोष साजरा करण्यात आला तर कॉग्रेस आयचे माजी शहराध्यक्ष अ सलिम महंमदसाब,शहराध्यक्ष सरान बागवान, तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे,अ वहिंद कुरेशी,निखिल दामंनगावे,इशू पठाण,शेख अजमत,अतिक,बंडू मोरे, यांसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी कुरेशी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.दरम्यानगटनेतेपदी निवड झाल्यानंतर हाजी खलील कुरेशी यांनी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, “पक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, मी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पूर्णा शहराच्या विकासाचे आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्याला माझे पहिले प्राधान्य असेल.



