प्रा. डॉ. अनिल कांबळे व प्रा.डॉ. उज्वला कांबळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

बुधवार.20. ऑगस्ट. 2025
नाशिक – पुर्णेचे भुमिपुत्र न्यायाला साथ अन्यायाला लाथ हे ब्रिद वाक्य उराशी बाळगून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी अग्रेसर असलेले प्रा. मास्टर अनिल रामभाऊ कांबळे व त्याच्या पत्नी प्रा.डॉ. सौ. उज्वला कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन यांना नाशिक येथील डि. एस. फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शिवाजीराजे जाधव लखोजी जाधव यांचे पंधरावे वंशज यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्या प्रा.अनिल कांबळे हे छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्या पत्नी उज्वला अनिल कांबळे भीमाशंकर पाडळकर मनुष्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक शिक्षक आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भगवान महावीर शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप राठोड, मूलनिवासी संघाचे रत्नदीप वेडे, प्रा. नंदा सातपुते. युवा नेते विशाल इंगळे, सुनीलकुमार लहाने आदींनी अभिनंदन केले आहे.



