Uncategorized

बळीराजा साखर कारखाना लि., कानडखेड चा हंगाम- २०२५-२६ रोलर पुजन कार्यक्रम संपन्न

रविवार 3 ऑगस्ट 2025

पूर्णा ( प्रतिनिधी ):- येथील बळीराजा साखर कारखाना लि., कानडखेड, येथे दि.०२ ऑगष्ट २०२५ शनिवार रोजी दुपारी ४.०० वाजता गळीत हंगाम २०२५-२६ रोलर पुजनाचा कार्यक्रम संचालक श्री दिनकर (अप्पा) जाधव यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन संपन्न झाला, गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने गाळप क्षमता वाढवून प्रती दिन ७५०० मे.टन गाळप क्षमता केलेली आहे. त्याअन्वये ऊस तोड वाहतुक ठेकेदारांचे करार केलेले आहेत. येणारा गाळप हंगाम चालु करण्याच्या दृष्टीने मशनरी दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर चालु आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक दिनकर भिमराव जाधव, सरव्यवस्थापक- भगवानराव मोरे, वर्क्स मॅनेजर – तुकाराम सुरवसे, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रीकल मॅनेजर- नितीन गणोरकर साहेब, चिफ केमीस्ट किरण मगर, चिफ, इंजिनिअर. मदन देशमुख, सुरक्षा अधिकारी-विनायक कदम, हेड टाईम किपर- गणेश सुर्यवशी ऊस पुरवठा अधिकारी- विनायक कहऱ्हाळे, रामजी शिंदे, बालासाहेब तिडके व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!