Uncategorized

गंगाखेड पोलीसांच्या सतर्कतेमुळे हरवलेले तीन लाख रुपये परत मिळाले


गंगाखेड डि.बी.पथकाची कामगीरी

रविवार.30. मार्च.2025

गंगाखेड प्रतिनिधी:- गंगाखेड – लेक्चर कॉलनी गंगाखेड येथील सेवानिवृत्त कर्मचारी व जेष्ठ नागरीक प्रभाकर बालासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.शारदा देशमुख हे आज दिनांक २९/०३/२०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजताचे सुमारास त्यांचे सुंदरलाल सावजी बँक येथून तीन लाख रोख रक्कम काढून त्यांच्या मोटारसायकल वरून भाजी मार्केट-अहिल्यादेवी होळकर चौक- डॉ. आंबेडकर चौक- रेल्वे गेट-तहसील कार्यालय यामार्गे लेक्चर कॉलनी येथे स्वगृही आले असता त्यांची तीन लाख रूपये असलेली गुलाबी बॕग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गंगाखेड येथे येऊन सपोनि श्री इंगळे यांची भेट घेतली. सदर बाब पोलीस ठाणे प्रभारी सहा.पोलीस अधिक्षक श्री हृषिकेष शिंदे व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. दिलीप टिपरसे यांनी डि.बी. पथक प्रमुख असद शेख व त्यांच्या टिम ला योग्य त्या मार्गदर्शक सुचना देऊन शोधकामी रवाना केले.
फिर्यादी यांचेकडुन घडलेले घटनाक्रम समजून घेऊन डि.बी. पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक असद शेख, पोहेका शंकर कामावाड, पोकॉ, परशुराम परचेवाड, चालक पोहेका श्री सावंत हे रनिंग स्पॉट इंस्पेक्शन करत असलेले सीसीटिव्हि फुटेज तपासत हरवलेल्या गुलाबी बॕगचा शोध घेतला व त्यातील तीन लाख रूपये देशमुख परिवाराच्या ताब्यात दिले…
देशमुख परिवाराने पोलीस पथकाने उन्हात चालत फिरत आमच्या काबाडकष्टाचे पैसे आम्हाला परत मिळवून दिले याबद्दल सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले…
केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मा. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी , मा. अपर पोलीस अधिक्षक काळे यांनी गंगाखेड पोलीस ठाणे प्रभारी सहा.पोलीस अधिक्षक श्री हृषिकेष शिंदे व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. दिलीप टिपरसे, डि.बी. पथक प्रमुख असद शेख व त्यांच्या डि.बी.पथकाचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!