Uncategorized

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळयात

दि.28.मार्च.2025

परभणी प्रतिनिधी:- दोनच दिवसांपूर्वी दोन आमदाराने विधानसभेत तक्रारीचा पाढा वाचत जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी बडतर्फ करण्याची मागणी केली होती. या मागणीवर कारवाई सुरू करण्याआधीच कामाच्या थकीत बिलांच्या मंजुरी करता सुमारे दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या या वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निंबाळकर व क्रीडा अधिकारी नानक सिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्यांच्या एका पथकाने गुरुवारी दि २७ मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. क्रीडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग मुलांच्या बांधकामासह या स्विमिंग पुलावर २०२४ आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांच्या एकूण 95 लाख रुपयांची थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर त्यांनी त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला. परंतु प्रत्येक वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणीवपूर्वक त्रुटी काढल्या त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकित बिलांच्या मंजुरी करिता क्रीडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे या दोघांच्या ३ मार्च रोजी स्वतः भेटी घेतल्या त्यावेळी नावंदे यांनी २ लाख रुपये बस्सी यांनी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली संबंधित तक्रारकत्यांनी.दि.१३ मार्च रोजी नावंदे यांना क्रीडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष १ लाख रुपये सुपूर्त केले परंतु उर्वरित दीड लाख रुपये द्यायची इच्छा नसल्याने या तक्रारकर्त्यांनी दि.२४ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने २४ मार्च रोजीच मागणीची पडताळणी केली. बस्सी व नावंदे यांची भेट झाली नाही.दि. २५ मार्च रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी नावंदे यांची भेट झाली. तक्रारकर त्यांनी प्रलंबित लाचे संदर्भात बोलले असता नावंदे यांनी पक्षा समक्ष तक्रार करतेस बस्सी सर येतील ते एक करून टाका असे म्हणून उर्वरित लाचेची रक्कम स्वीकारण्यास संहमती दर्शवली. या खात्याने त्या आधारे गुरुवार दि २७ मार्च रोजी सापळा रचला व नानक सिंह बस्सी यास ५० हजार रुपये.व जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या पथकाने तातडीने दोघांचीही झडती घेतली. त्यात नावंदे यांच्या पर्समधून लाचेची १ लाख रुपये व त्या व्यतिरिक्त ६ हजार रुपये व मोबाईल.तर.बस्सी यांच्याकडून लाचेची ५० हजार रुपये व त्या व्यतिरिक्त १ हजार ८३० रुपये रोख व मोबाईल जप्त नावंदे यांच्या परभणीतील निवासस्थानाची झडती घेतली असता त्या ठिकाणी १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम सापडली या खात्याच्या पथकाने नावंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील निवासस्थानाची तर बस्सी यांच्या नांदेड येथील निवासस्थानाची घर झडती सुरू केली होती. दरम्यान या दोघा आरोपी विरोधात येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या लाचखोर आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करा अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील व आमदार राजेश विटेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. त्यानंतर लगेच ही कारवाई झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!