Uncategorized

सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट टाकू नये परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आवाहन

शनिवार.22. मार्च. 2028

परभणी । जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट टाकू नये. असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना केले आहे. नागपुरात घडलेल्या घटनांचे कोणतेही वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करू नये. पोलीस ठाण्यात जमाव जमवून येऊ नये. ज्याची काही तक्रार असल्यास दोन व्यक्तींनी येऊन तक्रार द्यावी, बेकायदेशीर जमाव जमविण्याचे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. परभणी सायबर पोलिसांची सोशल मिडीयावर करडी नजर असून आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!