१,१८,७००/- रूपयाचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला (०१ इसमाविरुध्द NDPS कायदा अन्वये पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल*
*)(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)


मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभारी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पो.नि.. विकास पाटील यांना दिले होते.त्या अनुषंगाने दिनांक २३/०५/२०२४ रोजी स्थागुशाचे सपोनि. श्री. शिवसांब घेवारे यांचे पथक पो.स्टे. हिंगोली शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, हिंगोली शहरामध्ये रिसालाबाजार परिसरात आनंद प्रकाश पाईकराव याने अवैधरीत्या वाळलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून वरिष्ठांच्या आदेशाने स्थागुशा च्या पोलीस पथकाने पंचासह दिनांक २२/०५/२०२४ रोजीचे मध्यरात्री रिसालाबाजार भागातील आनंद प्रकाश पाईकराव यावे घरावर छापा मारला असता सदर घरामध्ये वाळलेला गांजा वजन ४ किलो ७४८ ग्रॅम एकुण किंमती १,१८,७००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून, सदर आरोपीविरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर येथे कलम ८ (क), २० (ब) ii (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीविरूध्द यापुर्वी सुध्दा अवैधरीत्या गांजा बाळगल्यामुळे ०४ वेळेस गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन, सदरील आरोपी हा सराईत गांजा विक्रीचे सवईचा आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा.अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, स्था.गु.शा. पथक, हिंगोली यांनी केली आहे.



