अर्धापूर सुतार समाज व नाभिक समाज स्मशान भुमी साठी इतरत्र जागा उपलब्ध करून तिथे स्मशानभुमीचे काम करा मुस्लिम समाज तर्फे मागणी
नांदेड प्रतिनिधि: खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर शहरात असलेल्या नवी आबादी, पाशा कॉलनी, सुफाकॉलनी, खुबा कॉलनी भागातील रहीवाशी असुन, हे की, अर्धापूर येथील गट क्र. (824) मधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलावाचे शुशोभीकरणाचे काम शासनाच्या अनुदानातुन करण्यात येणार आहे परंतु नवी आबादी भागातील मटन मार्केट शेजारून तालाब मैदानाकडे जाणारा रस्ता अगोदरच अरूंद आहे. त्यातल्या त्यात सदर कॉर्नरवर नाभीक समाज व सुतार समाज यांच्यासाठी स्मशान भुमीसाठी आरक्षीत केली आहे. सदर भागातील नागरीक पुर्वी पासुन सदर रस्त्याचा वापर नागरीक करत असतात. लहान मुले शाळेला जाण्या-येण्यासाठी सदर रस्त्याचा वापर करतात, तसेच आठवडी बाजाराती गुरेढोरे याच रस्त्याने बाजारात नेली व आणली जातात. तेव्हा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. परंतु तलावाकडे जाणारा रस्ता हा 45 फुटाचा असुन प्रत्यक्षात स्मशान भुमीजवळील रस्ता सध्या 30 फुटाचा उरलेला आहे. तिथे जर दोन्ही स्मशान भुमीचे काम केल्यास तलाव कडे जाणारा रस्ता हा अत्यंत अरूंद होईल. सदर स्मशान भुमीसाठी आरक्षित जागे लगतच कत्तल खाना असुन त्या लगत स्मशान भुमी करणे हे सोयीस्कर वाटत नाही. शहरात गट क्र. 189,178,600,548,698,679 येथे नगरपंचायत अर्धापूरची गायरान मालकी असुन अनेक ठिकाणी न.पं.ने यापुर्वीच आरक्षण टाकुण जागा न.पं. कडे घेतलेल्या आहेत. वरील नमुद एखादया गायरान जमीनीत जी न.पं. विकास आराखडयात आरक्षीत केलेली आहे. अशा जागेवर सदरील दोन्ही समाजाच्या स्मशान भुमी स्तलांतरीत करून शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तलाव शुशोभीकरणाच्या कामात रस्ता 45 फुटचा करावा तसेच अलीकड कत्तलखान त्याच्या बाजुला स्मशान भुमी राहणार यामुळे येणाऱ्या काळात काही अनुचीत प्रकार घडल्यास त्याचा जबाबदार कोण राहणार सर्व मुस्लीम बांधवाकडुन आपणास विनंती करण्यात येते की, नमुद गटात येथे असलेल्या गट क्र. 824 मध्ये असलेल्या सर्व स्मशान भुमी वरील नमुद केलेल्या गटांमध्ये बांधण्यात यावे तसेच बुरूड समाजाचे स्मशान भुमी सुध्दा सुफा कॉलनी भागात असुन ते सुध्दा न.पं.च्या आरक्षीत जागेमध्ये बांधण्यात यावे, अशी मागणी अर्धपुरच्या सर्व मुंस्लीम समाजतुं करण्यात आला




