ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात श्री विसर्जन उत्साहात संपन्न.
धर्मापुरी (प्रतिनिधी) :- ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव 10 दिवस उत्साहपुर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. तर गणेश विसर्जनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. किरण सोनटक्के व संस्थेच्या सचिव सौ. शितल सोनटक्के यांची उपस्थितीत श्रीची आरती संपन्न झाली. विशेष आकर्षण लेझिम पथक, आकर्षक रांगोळी, मुला मुलींसह कर्मचारी यांनी उत्साहपुर्ण घोषणा देत डिजेच्या तालावर नृत्य करत मनमुराद आनंद घेतला. गणेशाच्या आरती नंतर गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक खानापूरे एस.बी,प्राचार्य अशोक टी. प्राचार्य मधुकर ए.डॉ.भांगे जी,पाटील ए,सांस्कृतिक प्रमुख पडोळे जे आर,प्रमुख काळे पी एन,पनाड एस. व्ही एन.कुमावत एन.एस,नजन ए.ए .NSS प्रमुख पवार पी.बी.,निलवर्ण एस. डी. व तसेच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या वेळी सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना अल्पोहार प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोगदंड के.व्ही, लुटे ए.पी,घोगरे के.डी आवशंक डी.एन यांच्यां सह फार्मसीचे महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




