नूतन वर्षात पूर्णानगरीला नवा कारभारी; सौ. विमलबाई कदम उद्या स्वीकारणार नगराध्यक्षपदाची सूत्रे

बुधवार 31 डिसेंबर 2025
पूर्णा (प्रतिनिधी):नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पूर्णा शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडत, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. विमलबाई लक्ष्मणराव कदम या उद्या गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत.शहराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे विमलबाई कदम यांनी यावेळी सूचित केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पूर्णानगरपरिषद प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवक सज्ज झाले आहेत.कार्यक्रमाची रुपरेषा स्थळ: नगरपरिषद कार्यालय, पूर्णा. (जि. परभणी) वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता. प्रमुख उपस्थिती सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, शहरातील मान्यवर आणि नागरिक.नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा सोहळा पूर्णानगरीच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल,असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांनी या सोहळ्यास शहरवासीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




