Uncategorized
पुर्णा नगराध्यक्षा व नगरसेवकांनी केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

मंगळवार 30 डिसेंबर 2025
परभणी: आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला, हे या भेटीचे वैशिष्ट्य ठरले. यामध्ये पुर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. विमलबाई लक्ष्मणराव कदम,व गटनेते मुजीब सर आणि इतर सात नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना शहराचे प्रलंबित प्रश्न आणि नागरी सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी सविस्तर मते मांडली. नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यामुळे पुर्णा शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



