पूर्णेत आचार संहिता पथकाने केली मोठी कारवाई

बुधवार 19 नोव्हेंबर 2025
पूर्णा(प्रतिनिधी)पूर्णा शहरात नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी आचारसंहिता स्थिर तपासणी पथक क्रमांक ३ने शहरातील राजमुद्रा चौक परिसरात एका वाहनातून तब्बल ३० लाख रुपयांची संशयित रक्कम जप्त केली. त्याप्रसंगी पथक प्रमुख नारायण मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आचार संहिता पथक राजमुद्रा चौकात नियमित वाहनांची तपासणी करत करत होते. एमएच २६ बी एक्स ६५९६ क्रमांकाची कार संशयितरित्या जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास दिसले. संशय आल्याने वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत
३० लाख रुपयांची मोठी रोख रक्कम आढळून आली. तपासणी पथकातील
पथक प्रमुख ग्रामविकास अधिकारी.सदानंद राठोड सहाय्यक कृषी अधिकारी
शिवप्रसाद भोसले अधिकारी
पोलिस अंमलदार विलास बळवंते. अंमलदार.सुरेश मुंडे.
शिवानंद लेंडाळे, यांनी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाहनाचे चित्रीकरण केले. त्यानंतर पंचनामा तयार करून रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेली संपूर्ण रक्कम पूर्णा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार बोथीकर यांनी दिली. रकमेचा स्त्रोत व उद्देशाबाबत पुढील चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. असून इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे शहरामध्ये वेगळी चर्चा होताना पाहाव्यास मिळत आहे नेमकी रक्कम कोणाची आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नसून ही रक्कम कोणाची आहे हे पाहणे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे










