Uncategorized

त्यागमुर्ती माता रमाईच्या आदर्शाने देशातील महिलांचे चारित्र्य घडेल. रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे.

बुधवार.28.मे.25

पूर्णा प्रतिनिधी :- त्यागमुर्ती माता रमाई यांनी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतसंसार करतांना संसारातील अनेक अडचणी सहन केल्या.तरीही अडचणींचीतक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे केली नाही.निमूटपणे अडचणींतून मार्गकाढीत सुखाचा संसार केला.आपल्या उदरातील चार अपत्यांना काळाने घाला घातला.तरीही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत खंबीरपने उभ्या राहून आपले पती समाज आणि देश सेवेसाठी करीत असलेल्या कार्यासपाठिंबा दिला.कधीच कोणत्याही सांसारिक सुख,वैभवाची अपेक्षा केली नाही.म्हणूनच बाबासाहेब आपले शैक्षणिक,सामाजिक आणि राष्ट्र हिताचेमहान कार्य करू शकले.पत्नी म्हणून रमाई ने केलेल्या त्यागास इतिहासात तोड नाही.असा रमाईचा आदर्श देशातील प्रत्येक महिलेने आपल्यासमोर ठेवून आपले चारित्र्य घडवावे.असे विचारसुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंतप्रकाश कांबळे यांनी पूर्णा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंजना महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा शोभाताई कांबळे ह्या होत्या. पूज्य भदंत पय्यवंश,आणि भिक्खु संघ यांचे वतीने उपस्थितांना त्रिसरण पंचशील देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्णा न.प .चे गट नेते उत्तम खंदारे यांनी त्याग मुर्ती रमाई यांचे स्मृतीगीत गाऊन त्यांना अभिवादन केले.तर ऍड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड.धम्मदीप जोंधळे,सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडीत,सुप्रसिद्ध लेखिका ज्योती धुत्मल पंडीत यांनी माता रमाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देतरमाईंना अभिवादन केले. प्रकाश कांबळे पुढे म्हणाले,’ माता रमाईच्या जीवनाची यशोगाथा ही भारतीयमहिलांना प्रेरणादायी आहे.एव्हढेच नव्हे तर भारतीय इतिहासात बहिणाबाई चौधरी,पंडिता रमाबाई आदि मूठभर महिला असतील ज्यांची इतिहासाने दखलघेतली.त्यात माता रमाईआणि बहिणाबाईयांच्या कार्य कर्तृत्वाने त्या देशात आदर्श महिला ठरल्या.शेकडो लेखकांनी त्यांच्याजीवन कार्यावर प्रकाश टाकणारे हजारो लेख लिहिले तर अनेकांनी त्यांच्यावर मोठमोठे ग्रंथ,कादंबरी,नाटक आदि साहित्य निर्माण केले.अशा कर्तृत्ववान महिला देशात निर्माण व्हायला हव्यात.अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करीतत्यांना अभिवादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व महिला मंडळे,जयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवीण कनकुटे, कापुरे, बोधाचारी त्रिंबक कांबळेविजय सातोरे,अतुल गवळी, अमृत कऱ्हाले यांच्यासह बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी आणि शेवटी अनेक महिला व पुरुष कलावंतांनीमाता रमाई यांच्यावर शोक गीते गाऊनअभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!