Uncategorized

विवेक मुगळीकर यांना पुरस्कार

पुणे प्रतिनिधी :

पुणे येथील मराठवाडा युवा मंचच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी ११ वर्धापनदिन तसेच मराठवाडा मुक्ती दिना निमित्त विविध पुरस्कारांचे वितरणक करण्यात आले. यामध्ये हिंजवडी पोेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना प्रशासकीय पुरस्काराने गौरविण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास ठाणे येथील आयकर आयुक्त डॉ. संतोष मानकोसकर, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सौ. चेतना केरुरे, शुभम भोसले, प्रा. मिलींद जोशी आदींची उपस्थिती होती. डॉ. विवेक मुगळीकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पालम येथील माधवराव गायकवाड, बालासाहेब रोकडे, वसंतराव सिरस्कर, झिया पठाण,कादरभाई गुळखंडकर, भगवान सिरस्कर, गणेश हत्तीअंबीरे, उबेदखा पठाण, अजिम खॉ पठाण, असदखॉ पठाण, बाबासाहेब एंगडे, राहुल शिंदे, रहीमतुल्लाखा पठाण, मोबीन कुरेशी, गणेश घोरपडे, गजानन देशमुख, शांतीलाल शर्मा, मारोती नाईकवाडे,भास्कर लांडे, बाळासाहेब शिंदे, धोंडीराम कळंबे भगवान करंजे,राहुल गायकवाड, संग्राम खेडकरआदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!