Uncategorized

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ प्रतिनिधि:
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख,प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ देशपांडे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आजच्या काळातही गरज आहे. तर मुर्ती लहान पण किर्ती महान असलेले खंबीर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या देशाला लाभले हे आमचे भाग्य असल्याचे प्राचार्या डॉ देशपांडे म्हणाल्या. तर महात्मा गांधी यांचे अनमोल विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. जय जवान जय किसान चा नारा लालबहादूर शास्त्री यांनी सर्वप्रथम दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. यल्लावाड तर आभार प्रा.डॉ राजर्षी कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!